Ad will apear here
Next
‘आयपीसी’तर्फे मोफत तपासणी शिबिर
पुणे : इन्स्टिट्यूट फॉर प्रोस्टेट कॅन्सरतर्फे (आयपीसी) सहा ते १४ एप्रिल २०१८ या कालावधीत पुरुषांमध्ये आढळणाऱ्या प्रोस्टेट कॅन्सरबाबत मोफत तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.

‘जवळपास ६० टक्के रुग्ण डॉक्टरांना भेटतात जेव्हा ते शेवटच्या टप्यावर पोहचलेले असतात. ८०-९० टक्के संपूर्ण बरे झालेल्या रुग्णांचे निदान अगदी पहिल्या टप्प्यात झालेले असते. दुर्दैवाने भारतात मात्र यासंबंधी जागरूकता नसल्याने कित्येक रुग्ण अगदी शेवटच्या टप्प्यात उपचाराला येतात तेव्हा उशीर झालेला असतो,’ असे मत ‘आयपीसी’चे कन्सल्टंट युरोलॉजीस्ट डॉ. हृषीकेश देशमुख यांनी व्यक्त केले. ‘प्रोस्टेट कॅन्सर हा अत्यंत हळू गतीने वाढत असून अखेर प्राणघातक ठरतो त्यामुळे त्याचे प्राथमिक टप्प्यात निदान होऊन त्यावर उपचार होणे अत्यंत महत्त्वाचे आहे’, असेही ते म्हणाले.

‘आयपीसी’तर्फे गेल्या पाच वर्षांपासून प्रोस्टेट कॅन्सर आणि त्याचे निदान करण्यासाठी उपलब्ध अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी १२०पेक्षा अधिक शिबिरांच्या माध्यमातून ५० हजारांहून अधिक जास्त लोकांची जनजागृती करण्यात आली आहे.

वारंवार लघवी येणे, रात्री वारंवार लघवीला जावे लागणे, लघवीला त्रास होणे, लघवी पूर्ण होत नसल्याची जाणीव होणे व लघवीचा प्रवाह घटणे, ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत. कॅन्सरच्या पुढील टप्प्यांत हाडांमध्ये वेदना होणे, भूक कमी होणे याबरोबरच फ्रॅक्चर आणि अर्धांगवायूचा धोका देखील संभावतो.

भविष्यात प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी ५० वर्षांपुढील पुरूषांनी ‘पीएसए’ आणि ‘डीआरई’ तपासणी करण्याचा सल्ला ‘आयपीसी’ने दिला असून, कोणत्याही प्रकारच्या पाठदूखीकडे दुर्लक्ष करू नये, असे देखील सुचवले आहे. पूर्व निदान माध्यमातून प्रोस्टेट कॅन्सर असल्याचे समजले, तर बायोअप्सी करणे गरजेचे असते. बायोअप्सी ही एक साधी, सरळ पद्धत असून, ही अल्ट्रासाउंड मशीनच्या मदतीने केली जाते. ट्रान्स रेक्ट अल्ट्रासाउंडच्या (टीआरयुएस) मदतीने केली जाणारी बायोअप्सी आदर्श बायोअप्सी समजली जाते.

प्रॉस्टेट कॅन्सरच्या अचूक निदानासाठी जवळपास १२ ते १४ तुकडे टिश्यूजची अत्यंत पद्धतशीरपणे तपासणी करावी लागते आणि ‘एमआरआय’द्वारे कॅन्सरचा अधिक अचूक निदान होऊ शकते. वेळेत निदान झाले, तर हा कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. विशेषत: ५० वर्षे वयानंतर कोणत्याही पाठीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. प्राथमिक टप्प्यात निदान झाल्यास रुग्ण १०० टक्के बरा होऊ शकतो. उशीर झाल्यास प्रोस्टेट प्राणघातक ठरू शकतो. त्यामुळे तुमच्या सततच्या पाठदुखीवर दुर्लक्ष करू नका आणि तुमचे प्रोस्टेट वेळीच चेक करा.

शिबिराविषयी :
कालावधी :  सहा एप्रिल ते १४ एप्रिल २०१८
ठिकाण : इन्स्टिट्यूट फॉर प्रोस्टेट कॅन्सर, पुणे ग्राउंड फ्लोअर, कुमार– दी ओरायन, सेंट मिराज कॉलेजजवळ, डॉनबॉस्को युथ सेंटरच्या विरुद्ध, कोरेगाव पार्क, पुणे
संपर्क : ७७९८५ ७७५६३, ९७६६२ २७७१२
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZXVBN
Similar Posts
‘आयपीसी’मध्ये मोफत तपासणी शिबिर पुणे : इन्स्टिट्यूट फॉर प्रोस्टेट कॅन्सरमार्फत २५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
‘आयपीसी’तर्फे प्रॉस्टेटची मोफत तपासणी पुणे : इंडियन नॅशनल कॅन्सर रजिस्ट्रीनुसार प्रॉस्टेट कॅन्सरबाधित पुरुषांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हा कॅन्सर जगभरातील पुरुषांच्या मृत्युचे दुसरे प्रमुख कारण ठरला आहे आणि दुर्देवाची बाब म्हणजे प्रत्येक सहावा पुरुष प्रोस्टेट कॅन्सरबाधित आहे. म्हणूनच इन्स्टिट्यूट फॉर प्रॉस्टेट कॅन्सरतर्फे मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे
‘रुबी हॉल क्लिनिक’तर्फे कॅन्सर मॅनेजमेंट कोर्स पुणे : रुबी हॉल क्लिनिकतर्फे प्राथमिक देखभाल चिकित्सकांसाठी (प्रायमरी केअर फिजियन्स) १३व्या कॅन्सर मॅनेजमेंट शॉर्ट सर्टिफिकेट कोर्सचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
‘इंडस’तर्फे भिंतींवर कर्करोग जागृती संदेश पुणे : इंडस हेल्थ प्लस या प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी उद्योगातील आघाडीच्या कंपनीने पुणे येथे भिंत रंगवण्याच्या उपक्रमाचे आयोजन केले होते.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language